Monday, January 15, 2024

मराठी सराव चाचणी शब्दाच्या जाती नाम

मराठी सराव चाचणी शब्दाच्या जाती नाम इयत्ता पाचवीची 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' ही शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा ! पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन पेपर्स आहेत : पेपर 1 : मराठी भाषा (50 गुण) व गणित (100 गुण) - वेळ 90 मिनिटे ( 1 1/2 तास) पेपर 2: इंग्रजी भाषा (50 गुण) व बु‌द्धिमत्ता चाचणी (100 गुण) - वेळ 90 मिनिटे ( 1 1/2 तास) वरील पेपरनुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (मिडल्स्कूल स्कॉलरशिप) नवनीत : पेपर 1 मध्ये मराठी भाषा व गणित या विषयांचा, तर पेपर 2 मध्ये इंग्रजी भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रश्न देताना इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेतला असून; सोप्या, मध्यम व कठीण स्वरूपांच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून विदयार्थ्यांना या परीक्षेत अपेक्षित असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा पुरेसा सराव मिळेल. सरावासाठी दिलेल्या प्रश्नांसमोर OMR पद्धतीनुसार पर्यायाची वर्तुळे दिली आहेत. विदयार्थ्यांनी अचूक पर्यायी उत्तराचे वर्तुळ निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेननेच रंगवावे. सर्व स्वाध्यायांतील प्रश्नांची उत्तरे त्या त्या विषयाच्या शेवटी पडताळ्यासाठी देण्यात आलेली आहेत; तर बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील स्वाध्यायांमधील सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणांसह देण्यात आलेली आहेत, हे या नवनीतचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

मराठी सराव चाचणी शब्दाच्या जाती नाम

मराठी सराव चाचणी शब्दाच्या जाती नाम इयत्ता पाचवीची 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' ही शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक पर...